Online Public Data Entry (PDE) सुरु करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी.

Online Public Data Entry (PDE) सुरु करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी.

1) Online Public Data Entry (PDE) म्हणजे काय ?

    याबद्दल बोलायचं झाल्यास संगणीकृत पद्धतीने दस्तांची नोंद करत असताना आपल्याला त्याठिकाणी काही माहिती भरावी लागते. जसे की, दस्ताचा प्रकार, मिळकत, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, दस्तातील पक्षकार (लिहून देणार, लिहून घेणार, मान्यता देणार, मुखत्यारधारक इत्यादी.), ओळखदार इत्यादी माहिती भरावी लागते. हि माहिती आपल्याला कुठूनही, कोणत्याही वेळी भरता यावी यासाठी https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर एक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यालाच आपण Online Public Data Entry (PDE) असे म्हणतो.

2) Online Public Data Entry (PDE) चा आपल्याला फायदा काय ?

  1.  Public Data Entry (PDE) द्वारे आपल्याला आपल्याला आपल्या दस्ताची माहिती कुठूनही, कोणत्याही वेळी भरता येते.
  2.  ही माहिती आपण स्वतः भरत असल्यामुळे अचूक असते.
  3. दस्ताची माहिती आधीच Online Public Data Entry (PDE) द्वारे भरली असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील आपला वेळ वाचतो.

    3) Online Public Data Entry (PDE) सुविधा कोठे उपलब्ध आहे ?

    Online Public Data Entry (PDE) आपण नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली PDE FOR Registration या ठिकाणी जावून करु शकतो. त्यासाठी येथे click करा.

4) Online Public Data Entry (PDE) करण्यापूर्वी  कोणती पूर्वतयारी करावी ?

Public Data Entry (PDE) करत असताना आपल्याकडे पुढील माहिती उपलब्ध असल्यास  Online Public Data Entry (PDE) करणे सहज सोपे होते.
  1. ज्या दस्ताची नोंदणी करावयाची आहे त्या दस्तातील मिळकत, मालमत्ता, व्यवहार याची सर्व माहिती.
  2. दस्तातील सर्व पक्षकारांची माहिती. उदा. लिहून देणार, लिहून घेणार, मान्यता देणार, मुखत्यारधारक इत्यादी.
  3. दस्ताचे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरल्याची माहिती.
  4. ओळखदारांची माहिती.
    5) Online Public Data Entry (PDE) या सुविधेचा वापर कसा करावा ?

          Online Public Data Entry (PDE) या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याला नोंदणी व मुद्रांक  विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Online Services या सदराखाली PDE FOR Registration या ठिकाणी लागेल. या ठिकाणी PDE बाबत manual दिलेले आहे ते नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. Online Public Data Entry (PDE)  करण्यासाठी आपल्याला registration करुन आपला आपला Login ID व password तयार करावा लागेल. हा Login ID व password लक्षात ठेवा.

              Login ID व password टाकून दस्त नोंदणीसाठी सुरुवात करता येते. PDE करण्यापूर्वी दस्ताचा प्रकार, मिळकत, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, दस्तातील पक्षकार (लिहून देणार, लिहून घेणार, मान्यता देणार, मुखत्यारधारक इत्यादी.), ओळखदार इत्यादी माहिती आपल्या जवळ ठेवावी. PDE मध्ये काही बदल करायचा असल्यास आपल्याला Edit या पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. Online Public Data Entry (PDE) आपल्याला मराठी व इंग्लिश अशा दोन्ही भाषेत केली जाते. मराठी व इंग्लिश मध्ये तफावत असल्यास मराठी मधील माहिती ग्राह्य धरली जाते. 

      6) Online Public Data Entry (PDE) झाल्यानंतर पुढे काय ?

              PDE मध्ये दस्ताची नोंद केल्यानंतर आपल्याला 11 अंकी सांकेतांक मिळतो. (उदा.78594567851) हा सांकेतांक आपल्याकडे जपून ठेवा. आपण केलेल्या PDE मध्ये काही बदल अथवा दुरुस्ती करावयाची असल्यास या सांकेतांकाचा वापर करुन edit सुविधेच्या मदतीने आपल्याला आपल्या दस्ताच्या PDE मध्ये बदल करता येतो. e-step in या सुविधेचा वापर करुन आपण दस्त नोंदणीकरीता आपल्या सोईनुसार दिनांक, वेळ व दुय्यम निबंधक कार्यालयाची निवड करुन आपली वेळ आरक्षित करु शकतो. Online Public Data Entry (PDE) चा वापर करुन तयार झालेल्या माहितीची 1 प्रिंट साक्षांकित करुन ठेवावी.

      7) दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी जाताना आपण सोबत काय - काय घेवून जावे ?

              दस्त नोंदणीसाठी जाताना आपल्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

      1. शासकीय बाजारभावाप्रमाणे योग्य मुद्रांक शुल्क भरलेला व सर्व पक्षकारांचे फोटो व सह्या केलेला मूळ दस्त.
      2. ई-पेमेंट द्वारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरलेली असल्यास त्याची प्रत.
      3. दस्त नोंदणीसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व पक्षकारांची ओळखपत्रे, मोबाईल नं. व ई-मेल आयडी.
      4. ओळख  देणाऱ्या व्यक्ती व त्यांची ओळखपत्रे 
      5. दस्ताच्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्रे 
      6. दस्ताची नोंदणी शुल्क भरल्याची प्रत तसेच दस्त हाताळणी फी भरल्याची प्रत. (दस्त हाताळणी फी प्रति पान 20 रुपये या प्रमाणे भरावे.)
      7. कुलमुखत्यारपत्राच्या (power of attorney) आधारे दस्त नोंदणी करणार असल्यास त्याबाबत घोषणापत्र सादर करावे. 
      8. दस्त खरेदी विक्रीचा असल्यास आणि व्यवहार 5 लाखापेक्षा जास्त असेल तर पक्षकारांचे पॅन कार्ड जोडावे. 
      9. Online Public Data Entry (PDE) ची प्रत. 
      8) PDE साठी  फी किती आहे  ?

              Online Public Data Entry (PDE) करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. पक्षकारांनी केलेली Data Entry ही अचूक असणे अपेक्षित आहे. पक्षकारांनी Online Public Data Entry केली नसल्यास त्यासाठी 20 रुपये एवढी फी आकारली जाते. 

      आपल्या सूचना व अभिप्राय आम्हाला जरुर कळवा.

      धन्यवाद !

      टिप्पण्या

      या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

      Public Data Entry विषयी थोडक्यात

      Online Public Data Entry खाते तयार करणे