Online Public Data Entry खाते तयार करणे

 Online Public Data Entry खाते तयार करणे

कोणत्याही दस्ताची Online Public Data Entry करत असताना आपल्याला सवर्प्रथम आपले खाते तयार करावे लागते. (Registration) त्यानंतर आपल्याला आपल्या दस्ताची Data Entry करता येते.


पायऱ्या - 

1) Online Registration करणे (खाते तयार करणे)
2) दस्ताची नोंदणी करणे

1) Online Registration करणे (खाते तयार करणे) - 

  •  सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क च्या https://igrmaharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या. 
  • या वेबसाईट ला भेट दिल्यानंतर आपल्याला खालीलप्रमाणे view दिसेल.

  • आता चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पीडीई(रजि) या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढीलप्रमाणे पर्याय दिसतील. 
                                - विषय ओळख
                                - सेवा पीडीई (आय -सरिता 1.9 ) उर्वरीत महाराष्ट्रासाठी
                                -  सेवा पीडीई (आय -सरिता 2.0 ) हवेली 21 आणि 23 साठी
                                - मार्गदर्शक पुस्तिका
                                - प्रश्नोत्तरे 

  • वरील पर्यायांपैकी आपल्याला योग्य अशा  म्हणजेच सेवा पीडीई (आय -सरिता 1.9 ) उर्वरीत महाराष्ट्रासाठी या पर्यायावर क्लिक करायची  आहे. त्यानंतर आपल्याला पुढीलप्रमाणे नवीन विन्डो ओपन होईल. आपण थेट  https://pdeigr.maharashtra.gov.in  या लिंक ला क्लिक करून सुद्धा तेथे जावू शकता.


  • आता चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Proceed to Login या ठिकाणी क्लिक करा. आता नवीन विंडो ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आपले User Registration करायचे आहे.

  • Create new user account या ठिकाणी क्लिक केल्यानंतर New Users Sign Up चा फॉर्म ओपन होईल. तो काळजीपूर्वक भरून आपल्याला save  करायचा आहे. त्यानंतर verification चा मेसेज येईल. आता आपले अकाऊंट तयार झाले आहे.

  • आता विविध प्रकारच्या दस्तांची Online Public Data Entry करण्यासाठी आपण तयार आहात.

यापुढील भागामध्ये आपण विविध प्रकारच्या दस्तांची Online Public Data Entry ते पाहणार आहोत.

आपल्या सूचना व अभिप्राय आम्हाला जरुर कळवा.

धन्यवाद !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Online Public Data Entry (PDE) सुरु करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी.

Public Data Entry विषयी थोडक्यात