Online Public Data Entry (PDE) सुरु करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी.
Online Public Data Entry (PDE) सुरु करण्यापूर्वी लक्षात घ्यावयाच्या बाबी. 1) Online Public Data Entry (PDE) म्हणजे काय ? याबद्दल बोलायचं झाल्यास संगणीकृत पद्धतीने दस्तांची नोंद करत असताना आपल्याला त्याठिकाणी काही माहिती भरावी लागते. जसे की, दस्ताचा प्रकार, मिळकत, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, दस्तातील पक्षकार (लिहून देणार, लिहून घेणार, मान्यता देणार, मुखत्यारधारक इत्यादी.), ओळखदार इत्यादी माहिती भरावी लागते. हि माहिती आपल्याला कुठूनही, कोणत्याही वेळी भरता यावी यासाठी https://igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर एक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यालाच आपण Online Public Data Entry (PDE) असे म्हणतो. 2) Online Public Data Entry (PDE) चा आपल्याला फायदा काय ? Public Data Entry (PDE) द्वारे आपल्याला आपल्याला आपल्या दस्ताची माहिती कुठूनही, कोणत्याही वेळी भरता येते. ही माहिती आपण स्वतः भरत असल्यामुळे अचूक असते. दस्ताची माहिती आधीच Online Public Data Entry (PDE) द्वारे भरली असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयातील आपला वेळ वाचतो. 3) Onlin...